नोकरीचा शोध घेत असताना तणावात असाल तर हे करा

शनिवार, 9 जानेवारी 2021 (14:23 IST)
विपरित परिस्थितीमुळे बऱ्याच लोकांना आपली नोकरी गमावली लागते. अचानक नोकरी गेल्याने लोक तणावात येतात आणि दिवसभर नोकरीच्या शोधात असतात. पण ही पद्धत योग्य नाही अशा मुळे ते लोक त्या त्रासामधून निघण्याऐवजी अधिकच गुरफटतंच जातात. असे बऱ्याच वेळा होत की नोकरी सुटल्यामुळे काही लोक नकारात्मक विचारात बुडतात खरं तर असं करू नये. या साठी असे बरेच पर्याय आहे ज्यामुळे स्वतःला इंरोल करू शकता. 
 
जरी संपूर्ण दिवस ऑनलाईन पोर्टलवर चिटकून राहण्याने नोकरी मिळाली तरी त्या नोकरीमुळे समाधानी किंवा आनंदी होणार असे नाही त्यासाठी क्वांटिटी पेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या आणि जे देखील काम करत आहात ते शांत मनाने करण्याचा प्रयत्न करा. आम्ही सांगत आहो काही असे काम जे नोकरी शोधताना देखील आपल्या नित्यक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 
* व्यायाम - 
कामाच्या मध्ये वेळ काढणे खूपच कठीण काम आहे. तासनतास खुर्चीवर बसून काम केल्यानं शरीराचा आकार बिघडतो. अशा परिस्थितीत, आपण या वायफळ वेळात व्यायाम करू शकता या मुळे आपण पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त होऊ शकता. हे व्यायाम शारीरिक दृष्टयाच नव्हे तर मानसिक दृष्टया देखील निरोगी राहू शकाल. दिवसभर विचार करत बसल्याने देखील काहीच साध्य होत नाही. जर आपण व्यायाम कराल तर संपूर्ण दिवस सक्रिय राहाल आणि सक्रिय राहिल्याने मेंदू देखील चांगल्या प्रकारे काम करेल. 

* पुस्तकांना मित्र बनवा- 
बऱ्याच वेळा असं होत की कामाच्या ताणामुळे चांगल्या सवयींना विसरून जातो. त्यापैकी एक चांगली सवय आहे पुस्तक वाचणे. दररोज पुस्तक वाचून आपण आपल्या विचारशक्तीला वाढवूच शकत नाही तर प्रत्येक गोष्टींसाठी आपली दृष्टी विकसित करू शकता. या साठी आवडीची पुस्तक वाचणे सुरू करा. 
 
* मित्र आणि कुटुंबाला भेटा-
कामाच्या मध्ये वेळ काढून मित्र आणि कुटुंबाला वेळ कधी दिला असेल हे आपल्या लक्षातच नसेल. म्हणून मोकळ्या वेळेत मित्र आणि कुटुंबातील सदस्यां समवेत वेळ घालवा. या मुळे आपल्याला आनंद मिळेल. वाईट काळात मित्र आणि कुटुंब आपल्या सह उभे राहतात, अशा परिस्थितीत आपण काळजीत असाल तेव्हा त्यांच्याशी गोष्ट सामायिक करा. 
 
* स्वतःचे काम सुरू करा -
जर आपण एखाद्याच्या हाताखाली काम करून कंटाळा आला असेल तर स्वतःचे काम सुरू करण्याबद्दल विचार करू शकता. प्रत्येकामध्ये काही न काही कौशल्ये असतात, असं विचार करून आपण काम सुरू करू शकता. या वर्षी ज्यांनी काम सुरू केलेलं आहेत त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. बायकांनी आपल्या  क्वालिटीला ओळखुन आपल्या आवडीचे काम करायला पाहिजे. 
 
* नेटवर्क चांगले असावे -
बऱ्याच वेळा तासनतास जॉब पोर्टलवर वेळ घालवून काहीही होत नाही. या शिवाय आपल्या मित्र आणि ज्येष्ठांशी संवाद साधा. प्रयत्न करा की आपले नेटवर्क चांगल्या प्रकारे सुदृढ असावे आणि जर नेटवर्क चांगले असेल तर नोकरी मिळण्यात काहीही त्रास होणार नाही. नोकरीच्या व्यतिरिक्त देखील लोकांशी संवाद करा जेणे करून त्यांच्या संपर्कात राहू शकाल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती