संधी रिस्क मॅनेजमेंटमधील

बुधवार, 16 डिसेंबर 2020 (13:48 IST)
मॅनेजमेंटमधील अनेक पर्यायांपैकी एक आहे रिस्क मॅनेजमेंट. प्रत्येक व्यवसायात-धंद्यात जोखीम असते. ही जोखीम ओळखणं आणि त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य उपायांची अंमलबजावणी करणं याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. यासाठी विविध आस्थापनांमध्ये रिस्क मॅनेजमेंटम मध्ये विशेष शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे.
 
सामोर्या येऊ शकणार्यां प्रत्येक परिस्थितीचा, फायातोट्याचा विचार करुन, अनुमान काढून वाटचालीची योग्य दिशा ठरवणं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. नैसर्गिक आपत्तींपासून सामाजिक क्षेत्रात घडणार्यार घडामोडींपर्यंत सर्व बाबींची दखल रिस्क मॅनेजरला घ्यावी लागते. विमा पॉलिसी घेणं ही रिस्क मॅनेजमेंट नाही, तर धोक्याचं पूर्वानुमान जाणून तो टाळणं म्हणजे खरी रिस्क मॅनेजमेंट आहे.
 
आधी रिस्क मॅनेजमेंटसंबंधीचा अभ्यासक्रम शिकवण्याची सुरूवात पाश्चात्त्य देशांमध्ये झाली. मात्र काही वर्षांपूर्वी भारतातही यासंबंधीचे समग्रकोर्स काही निवडक शिक्षणसंस्थांमध्ये शिकवले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळे रिस्क मॅनेजमेंट कोर्स राबवले जातात.
 
कमर्शियल, फायनान्शियल, एंटरप्राईझेस रिस्क मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसंबंधी वेगवेगळा अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रात काम करायचं असल्यास तुमच्याकडे उत्तम विश्लेषण क्षमता असायला हवी.
 
सध्या अनेक आस्थापनांमध्ये रिस्क मॅनेजर्स टॉप पोझिशनवर कार्यरत आहेत. स्मॉल, मीडियम अथवा लार्ज स्केल इंडस्ट्रीज, सरकारी क्षेत्र, विमा कंपन्या, फायनान्शियल सर्व्हिसेस, कॉर्पोरेट एजंट्‌स आदी विविध क्षेत्रांमध्ये या तज्ज्ञांना विशेष मागणी आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत ही मागणी अनेक पटीने वाढणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या संधीकडे गांभीर्याने पाहावं.
अभय अरविंद 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती