कोणाच्या मनात काय चाललेय?

शनिवार, 6 मार्च 2021 (11:06 IST)
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याचा स्वभाव कसा आहे याबद्दल तुम्ही अचूक अंदाज बांधू शकाल. ज्याच्याविषयी तुम्ही जाणू इच्छित असाल त्याच्याशी फक्त एकदा हात मिळवा. मग कळेल की त्याच्या मनात काय सुरू आहे ते.
 
कसे ओळखायचे ?
- हस्तांदोलन करताना समोरचा माणूस दोन्ही हातांनी हात मिळवत असेल तर समजून घ्या की हा माणूस प्रामाणिक आणि विश्वासू आहे. असे लोक तुमच्याविषयी इमानदारीने आणि चांगले विचार करणारे असतात.
 
- कुणी तुमच्याशी हस्तांदोलन करताना बोटांच्या टोकांना दाबत हात मिळवत असेल तर समजून घ्या की, हा माणूस ढोंगी आहे. तुमच्याकडून कामे कशी करून घ्यायची याचाच विचार या लोकांच्या मनात असतो.
 
- हस्तांदोलन करताना एखाद्याचे हात सरळ आणि ताठ असल्यास समजून घ्या की हा माणूस तुमच्यासाठी व्यावहारिक आहे. तो तुमच्या मदतीस येऊ शकेल.
 
- हस्तांदोलन करताना पूर्णपणे हातात हात घेणारा आणि अधिक काळ हात सोडत नाही असा मनुष्य तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती