सीनियर सिटिझन्ससाठी पोस्ट ऑफिसची ही विशेष योजना

महागाईच्या काळात प्रत्येक मनुष्य पैसा कसा वाढेल या काळजीत जगत असतो. तर आज आम्ही आपल्याला सांगत आहोत अशा स्कीमबद्दल ज्यात विवेकपूर्ण गुंतवणूक केल्याने लाखाचो फायदा होऊ शकतो. जाणून घ्या कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येईल-
 
सीनियर सिटिझन सेविंग्स स्कीम (SCSS) पोस्ट ऑफिसची एक अशी योजना आहे ज्या माध्यमातून आपल्याला एका निश्चित काळात चांगलं रिटर्न मिळू शकेल आणि आपल्याला फायदा देखील होईल. या योजना अंतर्गत आपल्याला वार्षिक 8.7 टक्के या हिशोबाने व्याज मिळेल. या योजना अंतर्गत आपल्याला त्रैमासिक आधारावर व्याच मिळेल.
 
सीनियर सिटिझन म्हणजेच 60 वर्षाहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत खाता उघडू शकते. आपण इच्छित व्यक्तीला नॉमिनी करू शकता आणि विशेष म्हणजे आपलं हे खातं दुसर्‍या पोस्ट ऑफिसात ट्रांसफर देखील करू शकता.
 
या योजनेत आपणं अधिकात अधिक 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता. आपण वेगवेगळे खाते उघडून देखील याहून अधिक राशी गुंतवू शकत नाही. अर्थात आपलं पोस्टात एकाहून अधिक खाते असले तरी एकूण राशी 15 लाखाहून अधिक गुंतवता येणार नाही.
 
योजनेचा मेच्योरिटी पिरियड पाच वर्ष आहे. तसं तर आपल्याला एका वर्षानंतर देखील प्रीमेच्योर विदड्रॉल करता येईल. प्रीमेच्योर विदड्रॉलवर जमा राशीचा 1.5 टक्के शुल्क घेण्यात येतं. तसेच दोन वर्षांनंतर एक टक्के राशीत कपात होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती