दूर चित्रवाणी शाप की वरदान

सोमवार, 7 डिसेंबर 2020 (11:41 IST)
दूरचित्रवाणी विज्ञानाचे आविष्कार आहे. या मध्ये दिसणाऱ्या कार्यक्रमामुळे देश -परदेशातल्या गोष्टी कळतात. ज्यावेळी दूरचित्रवाणी आपल्या पर्यंत आली त्यावेळी  प्रत्येकाच्या घरा घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे आणि वाहिनी म्हणजे चॅनल्स देखील दोनच असायचे. आता तर चॅनल्सचा जणू पूरच आला आहे आपण आपल्या आवडीनुसार चॅनल्स बघू शकता. या मुळे आपले मनोरंजन होतात. ही एक करमणूक आहे. माणूस तासंतास ह्याचा पुढे बसून आपला जास्त वेळ घालवतो. याच्या मुळे डोळ्यांवर, कानावर आणि मेंदू वर देखील दुष्परिणाम होतात. ह्याचे नाव इडियट बॉक्स देखील आहे कारण या मध्ये काही मजकूर असे असतात ज्या मुळे मनुष्य सहजच बावळट बनतो. 

या मध्ये खेळाशी निगडित, प्राणी जगताशी निगडित,सर्व सामान्य ज्ञान मिळवून देणाऱ्या माहिती मिळतात. अशे बरेचशे चॅनल्स आहेत जे आपले मनोरंजन करतात आणि आपले ज्ञान देखील वाढवतात. मुलं तर कार्टून्सची चॅनल्स लावून तासन्तास याचा पुढे बसतात. बाहेरच्या मैदानाशी त्यांची ओळखच होत नाही. शेतकरींना पीक पिकविण्याची नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती या मधूनच मिळते. बातम्यांच्या चॅनल्सने जणू सर्व विश्वच व्यापून घेतले आहेत. आपण केवळ घरी बसून त्या -त्या  स्थळी जाऊ शकतो आणि माहिती मिळवतो.
 
या मधून आपल्याला जरी चांगली माहिती मिळत असली तरी कोणत्याही गोष्टीची अति करणे नुकसानदायीच आहे. याच्या मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. काही काही गोष्टी अशा दाखविल्या जातात ज्याचा या मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचे भविष्य बिगडतात. 

जे एकटे राहतात अश्या  वयोवृद्धांसाठी हे करमणूकी चे साधन आहे. काही अश्या गोष्टी दाखविल्या जातात त्यांच्या मुळे लोक गैर वर्तन तसेच गुन्हेगारींकडे प्रवृत्त होतात. प्रत्येक गोष्टीचे दोन रूप असतात चांगले आणि वाईट. आता हे आपल्यावर असत की आपण या पासून काय घ्यावं. सर्वानी दूरचित्रवाणी बघावी पण आपल्या मर्यादांमध्ये राहून. नाही तर हे मिळालेले वरदान कधी अभिशाप बनेल कळणारच नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती