आयसीसीच्या जागतिक गुणांकनात विराट टॉपवर

सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (09:09 IST)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत आयसीसीच्या जागतिक गुणांकनात टॉपवर पोहचला आहे. असा पराक्रम करणारा कोहली सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एखाद्या हिंदुस्थानी फलंदाजाने जागतिक गुणांकनात नंबर वन स्थान पटकावले आहे.
 
विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत टॉप स्थानावर मजल मारली आहे. कोहली ९३४ गुणांसह पहिल्या तर स्मिथ ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे स्टिव्ह स्मिथवर आयसीसीने एक वर्षाची बंदी लादली आहे. डिसेंबर २०१५पासून स्मिथ फलंदाजी गुणांकनात टॉपवर होता.यापूर्वी जानेवारी २०११ मध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी फलंदाजी गुणांकनात टॉपच्या स्थानावर होता. आतापर्यंत असा पराक्रम हिंदुस्थानच्या सात फलंदाजांनी केला आहे. त्यात विराट आणि सचिनव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग,गौतम गंभीर ,राहुल द्रविड ,सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती