क्रिकेट प्रशासनातून निवृत्तीचा शरद पवारांचा निर्णय

सोमवार, 25 जुलै 2016 (12:57 IST)
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद सोडण्याचा आणि क्रिकेट प्रशासनातून निवृत्तीचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. बीसीसीआय आणि संलग्न राज्य असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसाठी लोढा समितीनं 70 वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत आणि एमसीएची नवी घटना तयार होईपर्यंतच म्हणजे जास्तीत जास्त सहा महिनेच आपण या पदावर राहू असं पवारांनी स्पष्ट केलं. 
 
भारतीय क्रिकेटच्या प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी लोढा समितीनं केलेल्या शिफारशी सहा महिन्यांमध्ये लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर एमसीएच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत एमसीएनं लोढा समितीच्या सर्व शिफारशी मान्य केल्या आहेत. मात्र एक राज्य एक मत, या शिफारशीविषयी बीसीसीआयकडे अधिक स्पष्टीकरण मागितलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा