ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांच्या निधनावर मनसेकडून मालिका निर्माता आणि वाहिन्यांच्या संचालकांना सज्जड दम

मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (22:39 IST)
मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा करू नये असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालिका निर्माता आणि वाहिन्यांच्या संचालकांना दिला आहे.

टीव्ही मालिकेचे चित्रिकरण सुरु असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहिले. ७९ वर्षीय आशालता यांचे निधन झाले. 
दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच र्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकाॅलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे असे मनसेने म्हटल आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती