'LIVE INDEPENDENT' या नव्या कोऱ्या वेबसिरिजच्या पहिल्या पोस्टरमुळे वाढणार प्रेक्षकांची उत्सुकता

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (16:09 IST)
वर्ष २०२०... पण अजूनही मुलींना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे का? प्रत्येक मुलीच्या जगण्यात एखादी व्याख्या शोधली जात आहे का? घरी  मनमोकळे वातावरण जरी असले तरी घराच्या बाहेर जी दुनिया आहे त्यात ती बिनधास्तपणे वावरू शकतेय का? कळत नकळतपणे समाजाचा विचार मुलींच्या प्रगतीच्या आड येतोय का? तिला हवं तसं ती जगतेय का? तिच्या मनासारखी मोकळीक तिला मिळतेय का? 'LIVE INDEPENDENT' असं मनाशी पक्क धरून अनेकांना उंच भरारी घ्यावीशी वाटते... आणि यात काय गैर आहे?
 
यांसारख्या असंख्य प्रश्नांवर प्रकाश टाकून, मुलींच्या दृष्टीकोनातून एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित कथा 'लिव इंडिपेंडंट' (LIVE INDEPENDENT) या नव्या वेब सिरिजच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. नुकताच या वेब सिरिजचा मुहूर्त सोहळा इगतपुरी येथे पार पडला आणि पहिले वहिले पोस्टर देखील सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. साईनाथ राजाध्यक्ष निर्मित 'लिव इंडिपेंडंट' चे दिग्दर्शन तुषार घाडीगांवकर हे करणार असून सुमेध किर्लोस्कर हे या वेब सिरिजचे लेखक आहेत. यामध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि स्नेहल साळुंखे या प्रमुख भूमिकेत दिसतील. उत्तुंग मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. पराग सावंत हे डीओपी आहेत. फिल्मी आऊल स्टुडिओझ हे प्रॉड्शन्सचे काम पाहणार आहेत.
 
'लिव इंडिपेंडंट' या वेब सिरिजचे पोस्टर पाहता युथशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती