एअर इंडियाहून दुबई जाणारे प्रवासी आता 40 किग्रॅपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात

बुधवार, 17 जुलै 2019 (16:16 IST)
एअर इंडियाच्या विमानातून दुबई जाणारे यात्री आता चेक इनच्या स्वरूपात 40 किलोग्रॅम सामान घेऊन जाऊ शकतील. भारतातील राष्ट्रीय विमानन कंपनीने सामान घेऊन जाण्याची मर्यादेला आता 10 किलोग्रॅमपर्यंत वाढवले आहे. एअर इंडियाचे चेयरमेन अश्विनी लोहानी यांनी सोमवारी रा‍त्री भारतीय समुदाय द्वारे आयोजित स्वागत समारोहात म्हटले की मंगळवारापासून तिकिट बुकिंगमध्ये हे बदल करण्यात येतील.   
 
लोहानी यांनी म्हटले, ‘येथील लोक याची मागणी करत होते. आता प्रवाशी चेक इन लगेजच्या स्वरूपात 40 किलोग्रॅम सामान घेऊन जाऊ शकतील. त्याशिवाय त्यांना आधीप्रमाणे सात किलोचे हँडबेग ठेवण्याची अनुमती देखील राहणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान भारतीय समुदायाने चेक इन सामानाची मर्यादा 30 ते वाढवून 40 किलो करण्याची मागणी मांग केली होती.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती