मुंबई शेअर बाजार : निर्देशांकाचा 31 हजाराचा टप्पा पार

शुक्रवार, 26 मे 2017 (17:02 IST)
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 31 हजाराचा टप्पा पार करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 9600 अंकांचा टप्पा गाठला. मान्सून धडकणार असल्याच्या वृत्तामुळे शेअर बाजाराने उसळी घेतल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले. नरेंद्र मोदी सरकारला तीनवर्ष पूर्ण होत असताना विविध सर्वेक्षण चाचण्यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानकारक दिलेला कौल हे सुद्धा शेअर बाजाराच्या उसळीचे एक कारण आहे.  मारुती सुझूकी, टाटा स्टिल, भेल, अदानी पोर्ट, एशियन पेंटस, आयटीसी लिमिटेड, भारती एअरटेल, हिंडालको आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. त्यावेळी शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०,५८२ या नव्या उच्चांकावर बंद होताना निफ्टीने ९५०० चा आकडा पार केला होता.

वेबदुनिया वर वाचा