ट्रेनमध्ये उंदीर चावला, रेल्वे देणार 25 हजार नुकसानभरपाई

एका ग्राहक तक्रार फोरमने रेल्वेला एका ट्रेनमध्ये उंदीर चावल्यामुळे जखमी व्यक्तीला 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहे. रेल्वेला चिकित्सा खर्चाच्या रूपात दोन हजार रुपये व्यतिरिक्त देण्याचे देखील निर्देश दिले गेले आहेत.
 
फोरमचे अध्यक्ष आर व्ही दीनदयालन आणि सदस्य एस राजालक्ष्मी यांनी प्रवासी वेंकटचलम यांना मानसिक यातना झाल्यामुळे नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
 
त्यांनी रेल्वेला चिकित्सा खर्च म्हणून दोन हजार रुपये आणि कचेरीचा खर्च पाच हजार रुपये देण्याचेही सांगितले.
 
वेंकटचलम यांच्याप्रमाणे 8 ऑगस्ट 2014 रोजी ट्रेनने चेन्नई जाताना त्यांना उंदराने चावले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती