रेल्वेचे तिकीटासाठी आणखीन एक सुविधा

शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (15:25 IST)
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा आयआरसीटीसी आणि फोनपे यांच्या भागिदारीने सुरू होत आहे. रेल्वे प्रवाशांना 'रेल कनेक्ट अँड्रॉईड अॅप' वरुन ही सेवा उपलब्ध होत असून याद्वारे लवकरात लवकर तिकिटाचे डिजिटल बुकिंग करता येईल. विशेष म्हणजे सहजपणे रेल्वेच्या प्रवाशांना हे तिकीट बुकिंग करता येईल, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.
 
फोन पे कंपनीने गुरुवारी आयआरटीसीसोबत यासंदर्भात करार केला आहे. डिजिटल पेमेंटचा वापर कर्त्यांसाठी ही सुविधा वरदान असल्याचे Phone Pay ने म्हटले आहे. या भागिदारीमुळे Phone Pay युजर्स युपीआय, क्रेडिट आणि डेबिट कार्डऐवजी फोन पे वॉलेटद्वारे तिकिटाचे बुकिंग करु शकणार आहेत. तर, फोन पे द्वारे थेट युजर्सच्या बँक अकाऊंटवरुनही या सुविधेसाठी पैसे जमा केले जाऊ शकतात. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकींगसाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती