पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:41 IST)
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. राज्य सरकार पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याच्या विचारात असून, त्या बाबद विचारणा राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला केली गेली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे. जर गरज पडल्यास आरबीआयशी चर्चा करण्याचीही सरकारची देखील दर्शवली आहे. बँकेतील खातेदारांचं कोणतेही आर्थिक  नुकसान होऊ नये म्हणून पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्यात यावे आणि त्यांना आर्थिक मदत करत बँक वाचवली जावी अश्या विचारात राज्य सरकार आहे. राज्य सरकारने ही भूमिका घेतल्याने, हजारो खातेधारकांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे.
 
पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न असून, राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँक विलीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्य सरकारकडून राज्य सहकारी बँकेला विचारणा केली आहे. गरज पडल्यास आरबीआयची चर्चा करणार आहोत. आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जर असे झाले तर हजारो खाते धारकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान थांबवता येणार आहे. बँक बुडाली त्यामुळे त्या धक्क्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती