भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती दहा वर्षाच्या तुलनेत सर्वात खराब

कॅगने अर्थात केंद्रीय  लेखापाल समितीने आपला अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. या अहवालानुसार भारतीय रल्वेची आर्थिक स्थिती गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ ला सर्वात खराब झाली आहे. २०१७-१८ चा रेल्वेचा ऑपरेटिंग रेश्यो ९८.४४ टक्के इतका आहे. हा गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त ऑपरेटिंग रेश्यो आहे. 
 
ऑपरेटिंग रेश्यो म्हणजे खर्च आणि कमाई याच्यातील अंतर असते. रेल्वेचे २०१७-१८ मधील हे अंतर ९८.४४ टक्के आहे. म्हणजेच जर रेल्वेची कमाई १०० रुपये असेल तर रेल्वेचा खर्च हा ९८.४४ रुपये आहे. याचाच अर्थ म्हणजे रेल्वेचा ढोबळमानाने नफा हा १.५६ टक्के आहे आणि हा गेल्या १० वर्षातील निच्चांकी आहे.  
 
कॅगच्या अहवालानुसार रेल्वेकडे १ हजार ६६५.६१ कोटी रुपये रक्कम शिल्लक असायला हवी, पण ते ५ हजार ६७६.२९ कोटी रुपयांनी निगेटिव्ह बॅलेंस म्हणजे तोट्यात आहेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) आणि इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी लि. (IRCON) यांना अॅडव्हान्स दिल्याने रेल्वेचा बॅलेन्स निगेटिव्हमध्ये गेला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती