सर्वात मोठी लासलगाव येथे कांदा लिलाव महिना अखेर पर्यंत बंद, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

सोमवार, 25 मार्च 2019 (13:46 IST)
देश आणि आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोती मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील कांदा लिलाव मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बंद राहणार आहेत. या मोठ्या निणर्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा कांदा लिलाव प्रक्रिया बंद झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची शक्यता आहे.
 
पुर्वी हस्तलिखित चोपडीवर होणाऱ्या जमाखर्चाचे हिशोबाची व देवघेवेची मिळवणी करण्याकरीता बंद राहणारे मार्च अखेर दहा बारा दिवस बंद राहिलेले शेतीमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात आहेत. या वर्षी देखील सलग दहा दिवस शेतीमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांच्या सह शेतकरी वर्गात मोठी  नाराजी आहे.
 
शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि हित नजरेसमोर ठेऊन व कांदा पिकांची होणारी आवक व कमी झालेले भाव यामुळे हैराण झालेल्या शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी मार्च अखेर बॅकाची देणी देण्याकरीता बंद कालावधी कमी करावा अशी मागणी शेतकरी वर्गाचे वतीने करण्यात आली आहे.
 
लासलगाव बाजार समतिी आवारावरील कांद्यासह शेतमालाचे भुसार लिलाव आज शनिवार दि.२३ मार्च ते सोमवार दि.१ए प्रिल पर्यंत बंद राहणारआहेत. जवळपास १० दिवस शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येणार नाही.
 
मार्च एन्डिंगचं अर्थात आर्थिक वर्ष संपते असे  कारण देत व्यापाऱ्यांनी लासलगावमधील कांदा बाजारपेठ बंद ठेवण्याचा शेतकरी विरोधी निर्णय घेतलाय. तर पुढच्या महिन्यात एक एप्रिलपासून लासलगावमध्ये पुन्हा लिलाव सुरू होतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असणारा कांदा खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या आगोदर कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला सुरवातील आर्थिक फायदा होईल असे चित्र होते मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत कांदा भाव वाढले नाहीत त्यामुळे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सोसायटी व बॅंक आणि खासगी कर्ज घेतलेले छोटे शेतकरी मोठ्या अडचणीत असून शेतकरी आत्महत्या सुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे जर शेतकरीवर्गाला पैसे वेळेत मिळाले नाही आणि साठवलेला सध्याचा कांदा विकला गेला नाही तर मोठ्या अडचणी निर्माण होतील. या मुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. लासलगाव येथे सर्वात अधिक प्रमाणत कांदा लिलाव होतात त्यामुळे लासागावला मोठे महत्व आहे, या ठिकाणचे लोळाव बंद राहिले तर कांदा इतक्या दिवसात खराब देखील होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती