हापूस आंबा जीआय मानांकन मिळाले

आता कोकणचा आणि फळांचा राजा हापूस आंबा जीआय मानांकनाशिवाय विकता येणार नाही. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यात तयार होणाऱ्या आंब्याला जीआय मानांकन मिळालं आहे. विशिष्ठ चव, गोडवा आणि रंगामुळे हापूस प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कोकणच्या हापूस आंब्याला हे जीआय मानांकन मिळालं आहे. 
 
हे जीआय मानांकन मिळालेल्या चार संस्था आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकार संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था केळशी दापोली या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे सर्वच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकृतरित्या हापूसची विक्री करण्यासाठी या चार संस्थांपैकी एका संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती