भारतीय पोस्टाकडून ई ट्रेडिंग सुरू

सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (07:36 IST)
आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.
 
भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते. सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार आहे.  सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती