पांडवकडा भागात बंदीचे केले उल्लखन, पाचजण वाहून गेले

शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (16:24 IST)
नवी मुंबईतल्या पांडवकडा भागात असलेल्या धबधबा परिसरातून पाचजण वाहून गेले आहेत. यापैकी एकजण जिवंत आहे. बाकी चार तरुणींपैकी एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. पांडवकडा भागात जाण्यास बंदी असूनही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सदरचा प्रकार घडला आहे. 
 
पांडवकडा येथे निसर्गाचे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींचा एक ग्रुप पांडवकडा परिसरात फिरायला गेला होता. बंदी झुगारुन हे सगळेजण तिथे फिरायला गेले. त्यावेळीच ही घटना घडली. नेहा जैन या मुलीचा मृतदेह सापडला आहे. इतर तीन मुलींचा शोध सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती