अवकाळी पाऊस - केंद्राकडे 7 हजार 28 कोटींची मागणी

सोमवार, 9 डिसेंबर 2019 (10:39 IST)
अवकाळी पावसामुळं राज्यातील 94 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं केंद्रीय पथकाच्या पाहणीत आढळलं होतं. या नुकसानीपोटी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे 7 हजार 28 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
 
महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांच्या 325 तालुक्यांममध्ये अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालंय. यात प्रामुख्यानं भात, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवर मोठा परिणाम झाला होता. अवकाळी पावसाच्या संकटाचा एक कोटीहून शेतकऱ्यांना फटका बसला.
 
गेल्याच महिन्यात केंद्रानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं पथक राज्यातील अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासी पाठवलं होतं. अप्पर सचिव डॉ. वी. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक औरंगाबाद विभागात, कृषी विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक अमरावती आणि नागपूर विभागात, तर दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पाठवलं होतं.
 
या पथकाने अहवाल केंद्रास सादर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला तातडीनं मदतीची अपेक्षा आहे, असं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती