सावधान, अशा एसएमएसच्या लिंकवर क्लिक करु नका

शुक्रवार, 26 जून 2020 (20:37 IST)
कोरोना विषाणूची लोकांमध्ये भीती असून या भितीचा फायदा घेत अनेक सायबर हल्ले होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या नागरिकांच्या मोबाईलवर कोविड-१९ची मोफत तपासणी केली जात असल्याचा एसएमएस सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, अशी कोणतीही मोफत तपासणी केली जात नसून कोणत्याही बँक खातेदारानी त्या एसएमएसच्या लिंकवर क्लिक करु नये, असा सतर्कतेचा सर्वच बँकेकडून इशारा दिला जात आहे.
 
दरम्यान, बँक ऑफ बडोदा या बँकेने देखील त्यांच्या खातेदारांना सतर्कतेचा इशारा दिला असून ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण तुम्ही जर त्या लिंकला क्लिक केले तर तुमची सर्व बँक डिटेल्स समोरच्या व्यक्तीला मिळून तुमचे खाते रिकामी होऊ शकते. त्यामुळे कोविड-१९ मोफत तपासणी असा एसएमएस आल्यास त्यावर क्लिक करु नका, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती