निर्धारित किंमत अर्थात एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास 5 लाखाचा दंड

बुधवार, 28 मार्च 2018 (11:18 IST)
वस्तूच्या निर्धारित अर्थात छापील किंमत /एमआरपीपेक्षा जास्त पैशांना वस्तूंची विक्री करणे विक्रेत्यांना आता महागात पडणार आहे. आता या सर्व विक्रेत्यांवर ग्राहक मंत्रालय कठोर कारवाई करण्याचा विचार सरकार करत आहे. जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारला तर जो संबंधित विक्रेत्यांना 5 लाख रुपये दंड तर होईल व दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाणार आहे. केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. मात्र यामुळे असंख्य ग्राहकांना फायदा होणार आहे. त्यामुळे अनेकदा होणारी अतिरिक्त वसुली थांबणार आहे. एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारून वस्तूची विक्री करणाऱ्यांविरोधात 1800 11 4000 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. +918130009809 या क्रमांकावर SMS करूनही तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय मंत्रालयाच्या consumerhelpline.gov.in या वेबसाइटवरही तक्रार करता येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती