शेव्हिंग क्रीम बायकांच्या कामी येतात, आश्चर्य वाटत असेल तर फायदे जाणून घ्या

गुरूवार, 7 जानेवारी 2021 (19:22 IST)
शेव्हिंग क्रीम अशी वस्तू आहे जे सहसा सर्व घरात आढळते. पुरुष घरातच शेव्हिंग करणे पसंत करतात आणि नेहमी आपल्या किट मध्ये शेव्हिंग क्रीम ठेवतात. याच्या साहाय्याने आपण चेहऱ्यावरील केसांना सहजपणे काढू शकता.पण शेव्हिंग क्रीमचा वापर या पुरतीच मर्यादित नाही. याच्या मदतीने आपण बरेच लहान मोठे काम करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या शेव्हिंग क्रीमच्या आश्चर्यकारक वापरांबद्दल. 
* सनबर्न पासून आराम मिळतो -
 जेव्हा कडक उन्हात बाहेर जाता तर बऱ्याच वेळा कडक सनबर्न मुळे त्वचेत खूप जळजळ होते. अशा परिस्थितीत शेव्हिंग क्रीम वापरावे. हे सुखदायी प्रभाव देऊन जळजळ पासून आराम देतो.
* दागिने स्वच्छ करा -
शेव्हिंग क्रीम चा एक चांगला वापर हा देखील आहे. जरी दागिने अनेक प्रकारे स्वच्छ करू शकता, तरी शेव्हिंग क्रीमच्या साहाय्याने कोणत्याही अडचणीशिवाय दागिने स्वच्छ करू शकता. या साठी एक बाऊल मध्ये दागिने ठेवा. दागिन्यांवर शेव्हिंग क्रीम लावून हळुवार हाताने चोळा. 10 मिनिटे तसेच सोडा. नंतर स्वच्छ करून पुसून घ्या. दागिने पूर्वी सारखे चमकून निघतील आणि नव्या सारखे होतील.
* क्लीनिंगच्या कामी येतात - 
स्वयंपाकघरात क्लीनिंग साठी शेव्हिंग क्रीमचा वापर करतात. या साठी एक स्वच्छ कपड्यावर शेव्हिंग क्रीम घाला आणि स्टीलच्या भांड्यांवर चोळा. आपण बघाल की स्टीलचे भांडे चकचकीत झाले आहे. या शिवाय कार्पेट क्लीनिंग मध्ये देखील शेव्हिंग क्रीम कामी येते. हे थेट कार्पेटवर लावा आणि पेपरच्या टॉवेल ने स्वच्छ करा.
* नेल पेंट काढा-
 नेलपेंट लावताना चुकून आपल्या कडून नखाच्या जवळपासच्या क्षेत्रात लागले गेले आहे तर या साठी काळजी करू नका. नेलपेंट काढण्यात शेव्हिंग क्रीम आपली मदत करेल. हे नखाच्या जवळच्या क्षेत्रात लावा आणि सहज पणे स्वच्छ करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती