Beauty Tips : रेनी हेअर केअर

उन्हाळ्याच्या दाहानंतर धरतीला पाण्याची जितकी आस लागलेली असते, तितकीच आपल्या त्वचेला असते. उन्हाळ्यात सूर्यकिरणांचे त्वचेवर दुष्परिणाम झालेला असतो. पावसाळ्यातील ढग या किरणांपासून आपले संरक्षण करतात. हवेतील आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे शुष्कपणा जाणवत नाही, तरीही त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे. 
या हवामानात केसांची फार काळजी घ्यावी लागते. पाण्यातील क्लो‍रीनचा डोक्याच्या त्वचेला त्रास होतो. त्याने केस गळू लगातात. विहिराचे किंवा बोअरिंगचे पाणी वापरत असल्यास त्यात क्षारनिर्मलन करणारी रसायने घालून मग हलके झालेले पाणी केस धुण्यासाठी वापरावे. अन्यथा क्षार केसांवर बसून केसांचा मुलायमपणा नाहीसा होतो. या सुमारास केस गळू लागले वा राठ झाले, तर केस धुवायला योग्य पाणी वापरून सौम्य शॅम्पूने केस धुवावे व कोणत्याही आम्ल कंडिशनरचा वापर करावा. 
 
पांढरे व्हिनेगार, थंड पाण्यात अर्धे लिंबू पिळून केलेले पाणी, ताकाच्या व दह्याच्या वरचे पाणी या पदार्थात आम्लात असते. केसांच्या वर साठलेले क्षार यामुळे काढून टाकले जातात व केस मऊ राहून चमकदार होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती