परफ्यूम किंवा अत्तराचा वापर करत असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा...

रविवार, 19 जुलै 2020 (17:22 IST)
परफ्यूम किंवा अत्तराचा वापर करायला आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतं पण जर का आपल्याला वाटत असेल की हा वास किंवा सुगंध बराच काळ असाच टिकून राहो, त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या असे काही टिप्स ज्यांचा साहाय्याने हा सुवास बऱ्याच काळ दरवळत राहील.
 
* परफ्यूम किंवा अत्तराची बाटली उघडल्यावर त्याचा वापर नियमानं करावं. फार काळ वापरण्यासाठी ह्याला जास्त थंड किंवा गरम जागी ठेवू नये.
 
* परफ्यूम जास्त काळ टिकून राहण्यासाठी यावर लेयरिंग करणे आवश्यक आहे. त्वचेवर संट लेयरिंग करा. एकाच वासाच्या वेग-वेगळ्या वस्तूंचा वापर करावा जसे लेमॅन शॉवर, लेमॅन साबण बॉडी लोशन, लेमॅन युडी कोलन वापरावं.
 
* असे परफ्यूम वापरणे जास्त चांगले आहे, जे आपल्या व्यक्तिमत्त्वाला, शैलीला आणि तुमच्या कामाशी मॅच करत असेल.   
 
* परफ्यूम शरीरातील अश्या जागांवर लावावे, जे गरम राहतात. नाडी बिंदू (पल्स पॉइंट)वर ह्याला लावावं.
 
* त्वचेपासून 20 सेमी. अंतरावरून स्प्रे करावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती