निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, म्हणून ते सिनेसृष्टीतील लोकांना आणून तिकीट देत आहेत

शुक्रवार, 29 मार्च 2024 (08:47 IST)
निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वात पिछाडीवर दिसत आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. त्यामुळे, आगामी निवडणुकीत महायुतीच्या कोणत्या खासदाराचं तिकीट कापलं जाईल, याचीही चर्चा होत आहे. त्यातच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
"गोविंदा हे काँग्रेसचे खासदार होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच त्यांच्या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र, निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, म्हणून ते सिनेसृष्टीतील लोकांना आणून तिकीट देत आहेत, हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दुर्दैव आहे.", अशा शब्दात गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी टीका केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती