मोदी आहे खास, फक्त या तीन भारतीय अकाऊंटला फॉलो करंत व्हाइट हाऊस

शनिवार, 11 एप्रिल 2020 (17:37 IST)
भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध आता ट्वटिरवरुन समोर आले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान असणाऱ्या व्हाइट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटवरून जगभरातील केवळ 19 जणांना फॉलो केलं जातं. यापैकी तीन अकांऊट भारतीय आहे आणि 16 अकाऊंट अमेरिकन व्यक्तींची अथवा संस्थांची आहे.
 
व्हाइट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi), पीएमओ इंडिया म्हणजेच भारतीय पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट (@PMOIndia) आणि भारताचे राष्ट्रपतींच्या औपचारिक ट्विटर अकाऊंटला (@rashtrapatibhvn) फॉलो केलं जातं.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या अकाऊंटला नुकतचं फॉलो करण्यात आल्याचं दिसत आहे. सध्या या गोष्टींची सोशल नेटवर्किंगवरही खूप चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
 
याशिवाय भारताशी संबंधित आणखीन दोन अकाऊंट उर्वरित 16 जणांच्या यादीमध्ये आहे. ही अकाऊंट आहेत दिल्लीमध्ये असणारे भारतातील अमेरिकन राजदूतांचे अकाऊंट (@USAndIndia) आणि अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टनमध्ये असणारे भारताच्या अमेरिकन राजदूतांचे अकाऊंट (@IndianEmbassyUS).
 
भारत आणि अमेरिकेच्या संबंध मागील काही दिवसांपासून अधिकच मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यातच ट्रम्प हे सहकुटुंब भारत दौऱ्यावर आले होते तेव्हाही येथील आगत्य बघून खूप खूश झाले होते. तसेच करोना व्हायरस पसरत असलेल्या संकटाच्या या काळात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या गोळ्यांवरील निर्यात बंदी उठवली आणि अमेरिकेला या गोळ्यांचा पुरवठा केला आहे. यावर अमेरिका भारतावर खूश असल्याचे दिसून येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती