कोरोना संपवण्यासाठी मलम उपयुक्त असल्याचा दावा

शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (16:44 IST)
अमेरिकेतील फार्मा औषध कंपनीने कोरोना संपवण्यासाठी मलम उपयुक्त असल्याचा दावा केलाय. एफडीए नोंदणीकृत असलेल्या नॉन प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काऊंटर या मलमने कोरोना वायरस सहित अन्य विषाणुंच्या संक्रमणापासून देखील बचाव होईल असा दावा करण्यात आलाय. यासोबत उपचार आणि कोरोना संक्रमण संपवण्याची क्षमता या मलममध्ये असल्याचे सांगण्यात येतेय. 
 
टी३एक्स उपचारानंतर संक्रमण करणारा कोणता विषाणु न आल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाल्याचे कंपनीने म्हटलंय. हे एक महत्वपूर्ण संशोधन सिद्ध होईल. ज्यातून नाकाच्या वाटे कोरोना वायरस आत जाण्याची शक्यता कमी होईल असे एडवांस्ड पेनिट्रेशन टेक्नोलॉजीचे संस्थापक डॉ. ब्रायन ह्यूबर यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती