राज ठाकरे यांच्या मनसेची लगीनघाई ५०० जोडप्यांच करणार शुभमंगल

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:09 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. अमित यांचे लग्न फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी लग्नाची गाठ बांधली गेली. ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही अमित यांच्या विवाहाला हजार होते. आता लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई असल्याचे दिसून येते आहे. राज ठाकरे 500 आदिवासी मुला-मुलींच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असून मनसेकडून हा लग्नसोहळा आयोजित केला आहे. पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी परिसरातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार असून, अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती मनसेने दिली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा सामुदायिक विवाहसोहळा शनिवार 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. घर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विवाहसोहळ्याचे आयोजन केले आहे. अमित ठाकरेंचा विवाहसोहळ 27 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती. आता सामाजिक दायित्व म्हणून मनसे हा सोहळा करत    आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती