India's Miss TGPC ब्युटी कांटेस्टच्या फायनलमध्ये आरंभी माणके

मिस इंडिया जिंकण्याचं स्वप्न घेऊन ब्युटी कांटेस्टचा भाग असणारी मराठमोळी मुलगी आरंभी माणके हिने मिस टीजीपीसी फायनलमध्ये स्थान पटकावले आहे. 
 
मध्य प्रदेशाच्या इंदूर शहरातील रहिवासी आरंभीने सॉफ्टवेअर इंजीनियरिंगचा अभ्यास केला असून अनेक वर्षांपासून मॉडलिंगमध्ये करियर पुढे वाढवू बघत आहे. 
 
1900 प्रतिस्पर्धकांना मागे टाकत तिने फायनल पर्यंतचा प्रवास गाठला आहे. नृत्याची आवड असणार्‍या आरंभीला कुकिंगची देखील आवड आहे आणि त्याहून विशेष म्हणजे एवढ्या कमी वयात समाजाच्या उत्थानासाठी काही विशेष करण्याची तिची इच्छा तिला गर्दीपासून वेगळं करते. वेळोवेळी मुलींसाठी सेल्फ डिंफेसचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ती नेहमी तत्पर असते.
 
द ग्रेट पेजेंट कम्युनिटी यात देशभरातील मुली भाग घेत आहे. हे कांटेस्ट जिंकल्यावर ती मिस इंडियाची दावेदार होईल. अनेक मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स स्पर्धकांनी या प्रतिस्पर्धेच्या माध्यमाने यश प्राप्त केले आहे. आरंभीच्या स्पर्धासंबंधी आणि इतर समाज सेवा संबंधी व्हिडिओ बघण्यासाठी आपण या ‍लिंक वर क्लिक करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती