अमिताभ बच्चन यांची पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (09:30 IST)
कोल्हापूर आणि सांगली व सातारा जिल्‍ह्‍यातील पूरग्रस्तांच्या मदतीला मराठी चित्रपटसृष्‍टी प्रमाणे आता बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. अमिताभ यांनी आपल्या मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे आभार मानले.
 
बॉलिवूड कलाकार मदत करण्यात मागे राहिल्याने चौफेर टीका झाली. बॉलिवुडमधील काही कलाकारांनी पुरग्रस्तांच्या हाकेला धावून जात मदत देण्याचा निर्णय घेतला. अर्थात, काही कलाकांरांनी टीका होण्यापूर्वीच पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे. 
 
दुसरीकडे रिलायन्सकडून ५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती