अखेर जगातील पहिल्या हायपरपूलला राज्य सरकारची मान्यता किती मिनिटात कापणार मुंबई पुणे अंतर जाणून घ्या

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (17:01 IST)
आर्थिक राजधानी मुंबई येथून फक्अत अर्ध्या तासात सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार असून, विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ व ‘डीपी वर्ल्ड’ यांच्या कराराला पूर्ण  मान्यता दिली. जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होणार आहे. या हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची फार मोठी  बचत होणार आहे. तर रोजगाराच्या हजारो  संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी साडेतीन तासांचा अवधी लागतोच मात्र येत्या भविष्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्था अधिक बिकट होईल. यामध्ये मग मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ 31 मिनिटांत हे अंतर गाठता येईल. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती