डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल कर्मचार्‍यांना गुगलचा सलाम, खास डूडल

सोमवार, 13 एप्रिल 2020 (09:46 IST)
कोरोनाचे थैमान संपूर्ण जगात सुरुच असून या संकटाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांचं योगदान असामान्य आहे. आपल्या जीव धोक्यात घालून मेडिकल स्टॉफ दिवस-रात्र यासाठी काम करत आहे. त्यांच्या या सेवेला गुगलने डूडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे.
 
गुगलच्या खास डूडलवर “To all doctors, nurses and medical workers; thank you” हा मेसेज झळक आहे. अशाप्रकारची काही डूडल्स पुढे देखील पहायला मिळणार आहे.
 
मेडिकल स्टॉफचा योगदान खरंच असामान्य आहे कारण की या अनेक जागी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि मेडिकल कर्मचाऱ्यांना देखील करोना झाल्याची उदाहरणेही आहेत तरी सर्व आपले कर्तव्य पार पाडत आहेत. 
 
यांच्या सन्मानासाठी गुगल डूडलच्या काही सीरीज लॉन्च करत आहेत. या माध्यमातून गुगल करोनाव्हायरस हेल्पर्सला सलाम करणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वैज्ञानिक, शिक्षक, समाजसेवक आणि आत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती