लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की पाहुण्यांनी वेळेवर आपण हजर राहणार आहात की नाही याबद्दल माहीत पुरवली नाही तर स्वत:ची खुर्ची आणि सँडविच सोबत आणावं. 
 
हे सर्वात आधी एका यूजरने सोशल डिस्कशन वेबसाइट Reddit वर शेअर केलं आहे नंतर अनेक लोकांनी या वेडिंग कार्डचं कौतुक केलं आहे.
तसं तर, हे कार्ड कोणाचं आहे हे उघडकीस आलेलं नाही. यावर 10 सप्टेंबर 2019 पर्यंत लग्नात सामील होणार की नाही याबद्दल सूचित करावे असे लिहिले होते.
 
Reddit वर काही तासातच या पत्रावर हजारो कमेट्स आले. अनेक लोकांनी इतक्या स्पष्ट वागणुकीची प्रशंसा देखील केली आहे.
 
कपलने कार्डावर लिहिले होते की पाहुण्यांनी सांगावे की ते आमंत्रण स्वीकारत आहे वा नाही. परंतू त्यांचा जो काही निर्णय असेल तो 10 सप्टेंबरपर्यंत कळवावा. 10 सप्टेंबर पर्यंत उत्तर मिळालं नाही आणि त्यांना यावंस वाटलं तर स्वत:सोबत खुर्ची आणि सँडविच आणावं.
 
अनेक यूजर्सने कमेट्स केले आहे की ही एक चांगली व्यवस्था आहे, आपल्या आवडीची खुर्ची आणि सँडविच आणता येईल. काहींनी लिहिले आहे की अशा प्रसंगात गिफ्ट देण्याची गरजच नसणार म्हणजे हा तर फायदा आहे.
 
फोटो: सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती