इन्स्टाग्रामसह, व्हॉट्सअॅपमध्येही काही महत्त्वपूर्ण बदल

सोमवार, 11 जून 2018 (15:20 IST)
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे अॅप जगभरातील तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप फेसबुकनं विकत घेतल आहे. तर बाजारात इन्स्टाग्रामला टक्कर देणारेही अनेक अॅप आहेत. स्पर्धेत टिकाव धरावा यासाठी इन्टाग्रामपेक्षा अनेक चांगले फीचर्स काही अॅपनं देण्याचा प्रयत्न केल्यानं साहजिकच इन्स्टाची तरुणांमधली लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली आहे. म्हणूनच फेसबुकनं गेल्या वर्षभरात इन्स्टाग्रामसह, व्हॉट्सअॅपमध्येही काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता लवकरच युजर्सना त्यांच्या इन्टाग्राम प्रोफाईलवर फेसबुकचे नोटिफिकेशनही पाहायला मिळणार, रेडिट युजर्सनं या नवीन अपडेट्सबद्दल माहिती दिली आहे. फेसबुक नोटीफिकेशनच्या नव्या अपडेट्स सुरूवातील काही युजर्सपूरताच मर्यादित असून सध्या चाचणी घेतली जात आहे. इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला लिंक केलं असेल तर त्यांना फेसबुक संदर्भातल्या नोटीफिकेशन या इन्स्टाग्रामवर उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती