4 दिवसानंतर बंद होतील 90 कोटी डेबिट कार्ड, फेस्टिव सीझनमध्ये होईल कॅशची किल्लत

शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (00:26 IST)
या फेस्टिव सीझनमध्ये 90 कोटीपेक्षा जास्त डेबिट व क्रेडिट कार्ड धारकांचे कार्ड बंद होऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कार्ड देणार्‍या विदेशी कंपन्यांसाठी एक नियम काढला होता, ज्यासाठी त्यांना 6 महिन्याचा वेळ देण्यात आला होता. ही मुदत 15 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. आरबीआय ने मुदत वाढवण्याच्या आग्रहाला पूर्णपणे नकार दिला आहे.
 
या कंपन्यांचे कार्ड देण्यात येतात
देशात जास्तकरून बँका आपल्या ग्राहकांना मास्टरकार्ड किंवा विजा चा डेबिट-क्रेडिट कार्ड देतात. आरबीआय ने या विदेशी पेमेंट गेटवे कंपन्यांना देशात आपला सर्व्हर लावण्यासाठी 15ऑक्टोबर पर्यंतची सूट दिली होती.
 
वित्त मंत्रींशी बोलून देखील समाधान निघाले नाही
या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 5 ऑक्टोबर रोजी वित्त मंत्री अरुण जेटली यांची भेट करून आपले मत मांडले होते आणि मुदत वाढवण्याचा आग्रह केला होता. कंपन्यांचे म्हणणे आहे की डेटा स्टोर करण्यासाठी किमान 2 वर्षांचा वेळ लागेल. कंपन्यांना फक्त डेटा स्टोअर करण्याबदले कॉपी करून ठेवण्याची देखील सूट ची मागणी केली आहे.
 
वित्त मंत्रालय डेटाची कॉपी ठेवण्याच्या पक्षात आहे. आर्थिक प्रकरणाच्या सचिवांनी आरबीआयला पत्र लिहिले होते, पण आरबीआयकडून कंपन्यांना सूट मिळाली नाही.
 
फिका राहील फेस्टिव सीझन
आरबीआयचा निर्णय आल्यानंतर येणारा फेस्टिव सीझन फिका राहण्याची शक्यता आहे. नोटबंदीनंतर देशात डेबिट व क्रेडिट कार्डचे चलन फार वाढले आहे. जास्तकरून लोक आता कार्डच्या माध्यमाने खरेदी करतात. भारताने देखील आपले रूपे डेबिट क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. पण असे फारच कमी लोक आहे ज्यांच्याजवळ रूपे कार्ड आहे.
 
कार्ड बंद झाल्यानंतर यांचा प्रयोग वाढेल
मास्टरकार्ड आणि विजा चे डेबिट व क्रेडिट कार्ड बंद झाले तर लोकांजवळ कॅश शिवाय यूपीआय, नेटबँकिंग आणि मोबाइल वॉलेट सारखे पेमेंट करण्याचे विकल्प उरतील. पण याने तेच लोक पेमेंट करू शकतील, ज्यांच्याजवळ इंटरनेट कनेक्शन असेल आणि त्यांना या ऐपचा प्रयोग कसा करायचा हे माहीत असेल.
 
कॅशची किल्लत वाढेल
कार्ड बंद झाल्याने लोकांजवळ कॅशची किल्लत वाढणार आहे. जास्तकरून लोक अद्यापही आपल्या डेबिट कार्डचा वापर एटिएममधून पैसा काढण्यासाठी करतात. जर लोक एटिएममधून पैसा काढू शकणार नाही, तर ते फेस्टिव सीझनमध्ये शॉपिंग कसे करतील. आरबीआयचा हा निर्णय 90 कोटी लोकांवर पडणार आहे.
 
या प्रकारे बदला आपले क्रेडिट-डेबिट कार्ड
जर तुमच्याजवळ देखील मास्टरकार्ड किंवा विजा चा डेबिट आणि क्रेडिट कार्ड असेल तर त्याला तुम्ही बदलू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत संपर्क करावा लागणार आहे. बँकेत जाऊन तुम्ही कार्ड बदलण्याचा फॉर्म भरून द्या आणि रूपे कार्डची मागणी करा.
 
क्रेडिट कार्ड धारक बँकेच्या कस्टमर केअरवर फोन लावून या सुविधांबद्दल विचारू शकतात. एका आठवड्यात तुमचा नवीन रूपे चा डेबिट किंवा  क्रेडिट कार्ड तुमच्या घरी पोहचून जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती