राधाकृष्ण विखे पाटील देणार विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

मंगळवार, 12 मार्च 2019 (09:14 IST)
लोकसभा निवडणुकी मुळे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आता राज्यातील कॉंग्रेस मध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार आहेत असे सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश हे निशित असून, त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातं आहे. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली असू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधीही बैठकत होते. काँग्रेस नेतृत्त्वापर्यंत राधाकृष्ण विखेंनी त्यांची अडचण सांगितली आहे. यानंतरही सुजय विखे भाजपप्रवेशावर ठाम असून सुजय विखेंनी राष्ट्रवादीनेही स्वतःच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र सुजय विखे हे कॉंग्रेस सोडून आता भाजपा मध्ये प्रवेश करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती