अशोक चव्हाण लढवणार लोकसभा कॉंग्रेसची संभाव्य दुसरी यादी

मंगळवार, 19 मार्च 2019 (17:24 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस विविध राज्यातील उमेदवार याद्या जाहीर करत सून, आणखी एक यादी जाहीर होणार आहे. यादीत महाराष्ट्रातील नावांचा समावेश असणार आहे. पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीत महाराष्ट्रातील 5 नावांचा समावेश होता. महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे. 
 
आता प्रसिद्ध होत असलेल्या काँग्रेसची उमेदवार संभाव्य नावे अशी असतील नांदेड – अशोक चव्हाण. वर्धा – चारुलता टोकस. अकोला – डॉ. अभय पाटील, रामटेक – निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये, धुळे – कुणाल पाटील, यवतमाळ – माणिकराव ठाकरे असणार आहेत. तर या आगोदर नागपूर – नाना पटोले , गडचिरोली – नामदेव उसेंडी ,मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त ,मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा , सोलापूर – सुशील कुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. 
 
महाराष्ट्रात दोन महालढती सध्या दिसून येत आहेत, पहिली लढत उपराजधानी असलेल्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले असणार आहे. तर दुसरी लढत ही सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्यात होईल. त्यात भाजपा उमेदवार सुद्धा असणार असून निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती