आज कृष्णजन्माष्टमी, इकडे विदर्भात "कान्होबा" बसवितात

मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (01:48 IST)
आजच्या दिवशी श्री कृष्णाची मूर्ती वाजत गाजत घरी आणल्या जाते, त्याची विधिवत स्थापना होतें, आजूबाजूला पेरलेले जव असतात, वरती फुलोरा असतो.

फुलोरा म्हणजे त्यात पात्या,  करंज्या, वेण्या, फण्या अनारसे आदी वस्तू एका विषष्ठ आकाराच्या लोखंडी कड्या असलेल्या स्टँड वर अडकवून ते श्रीच्या डोक्यावर लटकवून ठेवतात. काही ठिकाणी ते 5, 7,9 च्या आकड्यात असतात. तसेंच नारळ पण त्याच संख्येने लटकवून ठेवतात.

संध्याकाळी आरती, नैवेद्य असतो, रितीनुसार जेवणं करतात.
रात्री भजन, पूजनाचा कार्यक्रम असतो, बरोबर रात्री १२ वाजता "बाळकृष्णा चा"जन्म करतात. "सुंठवडा"प्रसाद म्हणून सर्वांना देतात.
दुसरे दिवशी सकाळी आरती, पूजा, नैवेद्य असतो. दुपारी 4 वाजता भजन असतं. तेव्हाच "गोपाळकाला" करतात.
संध्याकाळी पुनश्च आरती होतें व सर्वांना गोपालकाला दिल्या जातो. "हरीचा काला गोड, झाला गोपाळा ने गोड केला" अस म्हणतात आणि आनंदात ग्रहण करतात.
नंतर अक्षत घालून रात्री 7/8 वाजता मूर्ती हलवून त्यांची आरती होते आणि अशारितीने विसर्जनाची तयारी सुरू होते. वाजत गाजत, गुलाल उधळत विसर्जन एखादे तळ्यावर, अथवा विहिरीत होते.
विसर्जन करून आल्यावर पेरून ठेवलेले "जव"घरातील वडील मंडळींच्या डोक्यावर ठेवतात व त्यांना नमस्कार करतात.
अशारितीने हा उत्सव समाप्त होतो. पुढच्या वर्षी यायचं आश्वासन घेऊन विसर्जन होते, पुनरागमनायच अस म्हणत आपण पुढील वर्षी ओढीनं वाट बघतो.... अशा सांभाळून ठेवल्या जातात परंपरा !!

.......अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती