गोकुळाष्टमी विशेष : लोणी

सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (10:54 IST)
हिंदू संस्कृतीत भरपूर सण-उत्सव आहेत, श्रावण म्हटलं की सणांची नुसती रेलचेल असते. गोकुळाष्टमी असाच एक उत्साहवर्धक सण, विशेषतः तरुण वर्गात या सणाचा उत्साह भरभरून वाहताना दिसतो. यंदा करोनाच सावट असल्यामुळे सर्व उत्सवावर थोडीफार बंधने घातलेली आहेत. त्यामुळे जन्माष्टमी पण अगदी साधेपणाने साजरी होणार.

अश्या परिस्थितीत सहजच मनमोहन कृष्णाच्या मनात विचार आला मग यंदा दहीहंडी नसणार म्हणजे लोणीपण नाही. पण मग त्याला थोड़ा आनंदही झाला चला बर आहे. गेल्या काही वर्षापासून जी थरांवर थरांची स्पर्धा सुरू आहे आणि त्यामुळे हंडीतल्या लोण्याचं रूपांतर कागदी मानधनात कधी झालं कळलच नाही. दरवर्षी किती तरी गोविंदा जीवावर उदार होऊन स्पर्धेसाठी धावपळ करतात व बरेचदा अपंगत्व त्यांच्या नशिबी येतं. यंदा स्पर्धा नाही, थर नाही हो पण त्यामुळे सगळ्या गोविंदाच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे व त्या भांड्यात पडलेल्या निश्चिंतरूपी, समाधानच जे लोणी आहे त्यावर मी यंदा माझा जन्मोत्सव आनंदाने साजरा करणार आहे. सर्व गोपाळ गोविंदांना समर्पित.  

- वर्षा हिरडे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती