या देशाने जिंकला पबजीचा PUBG Nations Cup पहिला वल्डकप

बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (16:23 IST)
PlayerUnknown’s Battleground म्हणजेच ‘पब जी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचं जोरदार धूम आहे. हा गेम सर्वच वयोगटामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण जगभरात PUBG ने धुमाकूळ घातला आहे. नुकतीच हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा आयोजित  केली होती. स्पर्धेत वर्ल्ड चॅंपियन बनण्यासाठी विविध देशांच्या अव्वल संघांनी आपआपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
दक्षिण कोरियाच्या सियोल शहरात तीन दिवस ही स्पर्धा आयोजित केली होती. नऊ ऑगस्ट रोजी स्पर्धेची सुरूवात झाल्यानंतर, तीन दिवसांच्या या स्पर्धेत रशियाचा संघ पहिल्या दोन दिवसांत टॉप-2 मध्ये देखील स्थान मिळवण्यात पूर्ण अपयशी झाला होता. पहिल्या दोन्ही दिवसांवर दक्षिण कोरियाच्या संघाचं स्पर्धेत पूर्ण वर्चस्व निर्माण केले होते. मात्र तिसऱ्या आणि अंतिम दिवशी रशियाने जोरदार मुसंडी मारत दक्षिण कोरियाला मागे टाकले. थेट प्रथम स्थान गाठलं. यासोबतच रशिया PUBG गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन झाला आहे. अंतिम दिवशी देखील दक्षिण कोरियाचा संघ पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आघाडीवर होता. पण अखेरच्या तीन फेऱ्यांनी स्पर्धेचं पूर्ण  चित्र बदलल आहे. अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये दक्षिण कोरियाच्या संघाला केवळ सात गुण मिळाले आणि त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. पहिल्या क्रमांकावरील रशियाला 127 पॉइंट्स मिळाले, तर दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण कोरियाला 123 पॉइंट्सवरच समाधान मानावं लागलं. 106 पॉइंट्स मिळवून कॅनडाने तिसरा क्रमांक गाठला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती