इंस्टाग्रामचे युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर्स

शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (16:43 IST)
इंस्टाग्राम ने आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचरवर काम करणे सुरु केले आहे. एखाद्या युजर्स ने न्यूड कन्टेन्ट पाठवल्यास ते आपोआप ब्लर होईल. ब्लर झालेला कन्टेन्ट पाहायचा की नाही या साठी युजर्सला एक पर्याय दिले जाईल. असा कन्टेन्ट पाठवणाऱ्या आणि रिसिव्ह करणाऱ्या युजर्सला इंस्टाग्राम सेफ्टी टिप्स सांगणाऱ्या पेजवर पाठवेल. 

या फोटोला जो पर्यंत कोणी रिपोर्ट करत नाही तो पर्यंत मेटाला या फोटोचा ऍक्सेस नसेल. रिपोर्ट केल्यांनतर मेटा हस्तक्षेप करेल. अलीकडील इंस्टाग्रामवर लहान मुले आणि महिलांशी संपर्क करून कोणत्याना कोणत्या मार्गाने न्यूड कन्टेन्ट शेअर करण्यास सांगितले जाते. त्यावरून खंडणी घेण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरु आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी इंस्टाग्रामचे हे फीचर्स उपयोगी असणार आहे. हे फीचर्स 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या युजर्स साठी लागू असणार. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती