SRH vs MI : मुंबई इंडियन्स संघ हॅट्ट्रिक करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादशी सामना करेल

बुधवार, 27 मार्च 2024 (14:37 IST)
SRH vs MI: आज आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ 2016 च्या चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत अनेकदा चुरशीची स्पर्धा झाली असून या हंगामातही चाहत्यांना चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 21 सामने झाले आहेत. यापैकी मुंबईने 12 तर हैदराबादने नऊ सामने जिंकले आहेत. मात्र, दोन्ही संघांमधील दोन सामने मुंबईने जिंकले असून सलग तीन विजयांची हॅट्ट्रिक साधण्याचे या संघाचे लक्ष्य असेल. गेल्या मोसमात मुंबईने हैदराबादचा दोन्ही सामन्यात पराभव केला होता. 

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या दोघांमध्ये आतापर्यंत आठ सामने झाले आहेत. या काळात दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. या दोघांमधील सामन्यात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने 16 विकेट घेतल्या आहेत.
 
सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा आठवा सामना बुधवार, 27 मार्च रोजी हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. 
नाणेफेक संन्ध्याकाळी 7 वाजता होईल. 
 
सनरायझर्स हैदराबाद- मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
प्रभावशाली खेळाडू- नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा.
 
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.
प्रभावशाली खेळाडू- डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, विष्णू विनोद, नेहल वढेरा, मोहम्मद नबी.
 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती