IPL 2024: वॉर्नर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार?

बुधवार, 17 एप्रिल 2024 (17:06 IST)
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरबद्दल मोठा अपडेट दिला आहे. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान वॉर्नरच्या बोटाला दुखापत झाली आणि सामन्यादरम्यान त्याचा एक्स-रे करण्यात आला. वॉर्नरची दुखापत हा दिल्लीसाठी मोठा धक्का आहे कारण आयपीएल 2024 चा सीझन आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी काही खास राहिलेला नाही.

गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी वॉर्नरच्या बोटाला सूज आली आहे , पॉन्टिंगने पत्रकार परिषदेत सांगितले की, वॉर्नरचा एक्स-रे करण्यात आला असून त्याचा अहवाल ठीक आहे, मात्र त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला अजूनही खूप सूज आहे. बुधवारी सकाळी वॉर्नरची फिटनेस चाचणी होईल, त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले. पॉन्टिंगने सांगितले की, शेवटच्या सामन्यानंतर वॉर्नरचा एक्स-रे करण्यात आला आणि अहवाल ठीक आला, पण त्याच्या बोटावर सूज आहे.
 
 या हंगामात दिल्लीला लुंगी नागिडी आणि हॅरी ब्रूक यांची सेवा मिळत नाही. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी दुखापती आणि वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. यानंतर संघाचा अष्टपैलू मिचेल मार्शही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात परतला. या हंगामात  वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्ससाठी सहा सामन्यांत 166 धावा केल्या आहेत. या हंगामात दिल्लीची कामगिरी चांगली राहिली नाही आणि दोन विजय आणि चार पराभवांसह सहा सामन्यांतून चार गुणांसह संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.

Edited By- Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती