आयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (09:30 IST)
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात  सुरुवात करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जचे विमान दुसर्‍याच सामन्यात जमिनीवर आले आहे. शारजाह येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉल्सने चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले 217 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवले नाही. 20 षटकात चेन्नईचा संघ 200 धावांर्पंतच मजल मारु शकला.

वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतु वॉटसन माघारी परतल्यानंतर   चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडे पडले. डु-प्लेसिसने 72 धावा केाल्या. राजस्थानकडून राहुल तेवटियाने 3, आर्चर गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. धोनीने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार खेचले तरी तचा फायदा संघास झाला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती