पुन्हा एकदा 'शटडाऊन' चे संकट

शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:05 IST)
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा 'शटडाऊन' चे संकटआहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या आर्थिक विधेयकाला अमेरिकन काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहातील प्रतिनिधींनी मंजुरी दिली आहे. मात्र, वरिष्ठ सभागृहात या विधेयकापुढे आव्हान आहे. 
 

अमेरिकन कॉंग्रेसची प्रतिनिधीगृह आणि सिनेट ही दोन सभागृह सरकारी खर्चाला मंजुरी देत असतात. सत्तारुढ रिपब्लिकन पार्टीने कनिष्ट सभागृहात बहुमतात विधेयक पास केल्यानंतर वरिष्ठ सभागृहात विधेयक पारित करण्यासाठी त्यांना विरोधी डेमोक्रेट पार्टीच्या समर्थनाची आवश्यकता आहे. डेमोक्रेट पार्टीने समर्थन दिले नाही, तर अमेरिकेतील सरकारी कामकाज ठप्प होण्याचे संकेत आहेत. १९९५ नंतर तिसऱ्यांदा अमेरिकेवर हे संकट आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती