जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा वाढदिवस

मंगळवार, 5 मार्च 2024 (13:36 IST)
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ति म्हणजे मारिया ब्रान्यास मोरेरा या स्पेन मधील कॅटालोनिया मध्ये राहतात. यांनी नुकताच त्यांचा 117 वा वाढदिवस साजरा केला. त्यांना गिनीज वल्ड रेकॉर्ड्सने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोरेरा यांचा जन्म 4 मार्च 1907 ला फ्रान्सिस्को मध्ये झाला त्या आपल्या कुटुंबासह वयाच्या 8 व्या वर्षी स्पेनमध्ये राहायला आल्या. त्या रेसिडेन्सिया सांता मरिया डेल तुरा नावाच्या नर्सिंग होम मध्ये राहत आहे. त्या त्यांच्या मुलीच्या मदतीने स्वत:चे ट्विटर अकाउंट अपडेट करत असतात. 
 
जानेवारी 2023 मध्ये मोरेरा यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब गिनीज वल्ड रेकॉर्ड्सने बहाल केला होता. मोरेरा यांची वाढत्या वयामुळे दृष्टी गेली त्यामुळे त्या व्हीलचेअरवरच बसायच्या. मोरेरा यांच्या पतीचे निधन वयाच्या 72 वर्षी झाले. त्यांना तीन मुले होती त्यातील एकाचा मृत्यु झाला व त्यांना आता नातवंड आणि पणतू आहेत. 
 
तसेच मोरेरा यांना श्रवण आणि हालचाल या व्यतिरिक्त कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नाही. मोरेरा सांगतात की नशीब तसेच चांगली सुव्यवस्था, शांतता, कुटुंब, नातेवाईक, मित्रंशी चांगले संबंध तसेच निसर्गाशी जवळीक, भावनिक स्थिरता, भरपूर सकरात्मकता या सर्व घटकांनी त्यांच्या दीर्घायुष्यात भर घातली आहे. म्हणून जानेवारी 2023 मध्ये गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्सने मोरेरा यांना सर्वात वयस्कर जिवंत व्यक्तीचा किताब दिला होता.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती