Holi Purnima Chandra Upay : होळीच्या दिवशी चंद्राला अर्पित करा दूध, धन संबंधी अडचणी दूर होतील

बुधवार, 4 मार्च 2020 (11:02 IST)
जर आपण अत्यंत आर्थिक समस्येमुळे त्रासला असाल तर होळीच्या दिवशी चंद्राचा हा उपाय नक्की अमलात आणा. होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यावर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या जागेवर जिथून चंद्र स्पष्ट दिसत असेल तेथे उभे राहा. नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटातील खारका आणि मकाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिवा लावून धूप आणि उदबत्ती दाखवत पूजा करा.
 
आता दुधाने अर्घ्य द्या. अर्घ्य दिल्यानंतर पांढरा प्रसाद आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करा. चंद्राला आर्थिक संकट दूर करून समृद्धी प्रदान करण्याची प्रार्थना करा. नंतर प्रसाद मुलांना वाटून द्या.
 
तसेच दर पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाचे अर्घ्य अवश्य द्यावे. काही दिवसातच आर्थिक संकट दूर होऊन भरभराटी येत असल्याचे जाणवेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती