रामाने लक्ष्मणास दंड का दिले...?

बुधवार, 15 एप्रिल 2020 (21:37 IST)
अशी आख्यायिका आहे की रामाने आपल्या धाकट्या लाडक्या भावाला लक्ष्मणाला मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. आता प्रश्न हा पडतो की लक्ष्मण तर रामाला प्रिय असतानाही रामाने त्याला अशी घोर शिक्षा का दिली? 
 
त्यामागचे कारण असे की लंकेच्या विजयानंतर राम अयोध्येला परतले आणि राजा बनले. एके दिवशी यमदेव श्रीरामाकडे महत्त्वाचे विचार विमर्श करावयास आले होते. त्यांनी श्रीरामांकडून वचन मागितले की आपल्यामध्ये विचार विमर्श सुरू असताना कोणीही येऊ नये आणि जो येईल त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी. रामाने लक्ष्मणास ह्या बाबतीचे सर्व सांगितले आणि लक्ष्मणाला दारावर उभे राहून रखवालदार म्हणून उभे केले. 
 
काही काळानंतर तेथे ऋषी दुर्वासा श्रीरामाशी भेटावयाची इच्छा घेऊन येतात. पण लक्ष्मण त्यांना जाऊ देत नाही. त्यावर ऋषी दुर्वासा रागावतात आणि अयोध्येला श्राप देऊन अयोध्येचे नायनाट करण्याचे सांगतात. 
 
लक्ष्मण असे ऐकल्यावर विचारात पडतात की अयोध्येला वाचविण्यासाठी मी स्वतःच शिक्षा भोगेन असा विचार करून ते श्रीरामाकडे जाऊन ऋषी दुर्वासा येण्याच्या निरोप दिला.
 
आता श्रीरामाला प्रश्न पडले की करावे तरी काय. आपण दिलेल्या वचनांचे अनुकरण तर करावेच लागणार आणि अज्ञाची अवहेलना केल्यामुळे लक्ष्मणास मृत्युदंड द्यावेच लागणार. अशावेळी ते गुरु वशिष्ठ यांचा कडे गेले आणि काही सुचवावे असे सांगितले. गुरु वशिष्ठ म्हणाले आपण आपली कुठलीही आवडती वस्तूचा त्याग करावा म्हणजे ते त्याची मृत्यू समानच असतं. लक्ष्मणाने हे ऐकल्यावर श्रीरामाला विनवणी केली की आपण माझा त्याग करू नका. मी स्वतःलाच शिक्षा देऊ इच्छितो. असे म्हणून लक्ष्मणाने पाण्यात जीवांत समाधी घेतली आणि आपल्या वचनांचे पालन केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती