शनी जयंती 2020 शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

गुरूवार, 21 मे 2020 (11:53 IST)
शनी जयंती वैशाख अमावास्येला असून या दिवशी शनीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तर जाणून घ्या या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी-
 
व्रत करणार्‍यांनी या दिवशी सकाळी उठून नित्यकर्म आटपून स्नान करावे.
नंतर लाकडीच्या पाटावर स्वच्छ काळ्या रंगाचे कापड आसन म्हणून घालावे.
यावर शनी देवांची प्रतिमा किंवा फोटोची स्थापना करावी. 
मुरती किंवा फोटो नसल्यास एक सुपारी ठेवून त्या भोवती शुद्ध तूप आणि तेलाचा दिवा लावावा. 
नंतर धूप जाळावा. 
या स्वरूपाला पंचगव्य, पंचामृत, अत्तर इतर वस्तूंनी स्नान करवावे. 
शेंदूर, कुंकू, काजळ, अबीर, गुलाल इतर वस्तूंसह निळे फुलं देवाला अर्पित करावे.
इमरती आणि तेलात तळलेले पदार्थ अर्पित करावे. 
श्री फळ सह इतर फळं देखील अर्पित करू शकता. 
पंचोपचार व पूजन केल्यानंतर शनी मंत्राची माळ जपावी. 
शनी चालीसा पाठ करावा. 
शनी देवाची आरती करावी. 
 
शनी जयंती पर्व तिथी व मुहूर्त 2020
शनी जयंती 22 मे 2020 
 
अमावस्या तिथी आरंभ - 21:35 पासून (21 मे 2020)
 
अमावस्या तिथी समाप्त - 23:07 पर्यंत (22 मे 2020)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती